मराठी संदेश: चारोळ्या
मराठी कथालेखक व कवी मा. चंद्रशेखर गोखले यांच्या ‘मी माझा’ या काव्यसंग्रहातून घेतलेल्या साभार चारोळ्या!

चारोळ्या
मी बुडताना

मी बुडताना माझा
गाव ओझरता पहिला होता,
मला पहायला गाव माझा
काठांवर उभा राहिला होता

चारोळ्या
माझ्या हसण्यावर जाऊ नका

माझ्या हसण्यावर जाऊ नका
माझ्या रुसण्यावर जाऊ नका,
जरी मी तुमच्यात असलो तरी
माझ्या असण्यावर जाऊ नका

चारोळ्या
मी आहेच जरा

मी आहेच जरा
असा एकटा एकटा राहणारा,
वाळकं पान सुद्धा गळताना
तन्मयतेने पाहणारा