मराठी संदेश: चारोळ्या
मराठी कथालेखक व कवी मा. चंद्रशेखर गोखले यांच्या ‘मी माझा’ या काव्यसंग्रहातून घेतलेल्या साभार चारोळ्या!

मला पक्कं ठाऊक आहे कि
चारोळ्या
मला पक्कं ठाऊक आहे कि
प्रत्येक गोष्टीला अंत आहे
म्हणून मी काही बोलत नाही
मी अगदी शांत आहे
ज्या गोष्टीची भीती होती
चारोळ्या
ज्या गोष्टीची भीती होती
तेच होऊन बसलंय
तुझ्याकडं पाठवत नाही
म्हणून मन माझ्यावर रुसलंय
तू सोबत असलीस कि
चारोळ्या
तू सोबत असलीस कि
मला माझाही आधार लागत नाही
तू फक्त सोबत रहा
मी दुसरं काही मागत नाही
एकदा माझा एकलेपणा
चारोळ्या
एकदा माझा एकलेपणा
माझ्याशी बोलका होतो
मग कोणी एक शब्द जरी बोललं
तर त्याचाही गलका होतो
झिजेल म्हणून चंदन मी
चारोळ्या
झिजेल म्हणून चंदन मी
उगाळायचं थांबवलं तर
कंटाळून ते मला म्हणालं माझं
उरलं आयुष्य उगीच लांबवलं
घर दोघांचं असतं
चारोळ्या
घर दोघांचं असतं
ते दोघांनी सावरायचं
एकानं पसरवलं
तर दुसर्याने आवरायचं

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२१