मराठी संदेश: शुभ दिन
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

गुण दोष शुभ दिन

आपण आपले "गुण" ओळखावे, "दोष" सांगण्यासाठी लोक आहेतच. पाऊल टाकायचे असेल तर "पुढे" टाकावे, "मागे" ओढायला लोक आहेतच. स्वप्न पाहायचे असतील तर "मोठेपणाचे" पहावे, "कमीपणा" दाखवायला लोक आहेतच!

संधी शुभ दिन

संधी येत नसते, आपण ती आपल्या कार्यातुन निर्माण करायची असते. नाव नाही झालं तरी चालेल पण काम असं करा की लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे.

शांत व प्रसन्न मन शुभ दिन

शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असते.

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०