मराठी संदेश: हसा ओ

हसा ओ
दिवे लावले?

आकाशकंदील लावण्याची दिशा नेमकी कशी असावी ?

आकाशकंदील उजव्या हाताने दरवाज्याच्या बरोबर वरील दिशेला लावावा. घराच्या आग्नेय दिशेला आकाशकंदील लावण्यामुळे आपल्या घराची शोभा वाढते, घरात सुख शांती लाभते, पैसा येतो, भाग्य उजळते, मनःशांती लाभते...
....
.....

असं काही नाही...!
बायको सांगेल तिथेच लावा... जास्त शहाणपणा करू नका!

हसा ओ
पगार

काल सहज बोनस आणि पगार बद्दल विचार करत बसलो होतो .. तोपर्यंत.....
....
...
..
.
तो केळेवाला ओरडला..
केळे घ्या केळे... 🍌🍌🍌🍌🍌

हसा ओ
वाईट सवयी

आज साखर सोडून एक महीना पूर्ण झाला. प्रतिदिन नाश्त्यापूर्वी पाच किलोमीटर वेगात चालणे आणि मग कमीत कमी वीस मिनिट योगा करणे हे रूटीन झाले आहे. ना चहा आणि ना कॉफी.. केवळ फळे आणि हिरव्या ताज्या भाज्या आणि त्या पण ऑर्गेनिक!

दुपारी दोन पोळ्या आणि भाजी.. संध्याकाळी थोड़े ड्राय फ्रूट आणि सारी सीजनल फ़्रेश फ्रूटस् .

अल्कोहोल आणि मांसाहार तर बिलकुल बंद!

सगळ्या वाईट सवयी सोडल्यात....
आता फक्त..
...
....
.....
......

या खोटं बोलण्याच्या सवयीवर कंट्रोल करणे बाकी आहे!