मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

राजकारण..
हसा ओ
तसा तो शेतात चांगला काम करत होता. उत्पन्न पण चांगलं होत. मग कोणीतरी त्याला "भावी सरपंच" म्हणाले आणि त्याचा सत्यानाश झाला!
रशियन..
हसा ओ
रशियन लसीचे नाव: टुचकन टोचलिस्की
टोचून घेणाराचे नाव: वस्कन ओरडलास्की
डॉक्टरचे नाव: कचकन घुसवलीस्की
आणि...
हे सर्व वाचणाराचे नाव: खुदकन हसलास्की..
प्रश्न
हसा ओ
एक प्रश्न होता:
माहेरी गेल्यानंतरही बायको तिथुनच नवऱ्याशी भांडत असेल तर त्याला "वर्क फ्रॉम होम" असं गृहित धरले जाईल का?
३६ गुण
हसा ओ
आमचे ३६ गुण जमतात. त्यातील ३५ गुण बायकोकडे आहेत व एकच गुण माझ्याकडे आहे, तो म्हणजे "गप्प बसणे"!
- पु. ल.
आयुष्य
हसा ओ
लग्न झालेल्या माणसाचं आयुष्य काश्मीर सारखं असतं, खूप सुंदर असतं पण कायम दहशत!

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०