मराठी संदेश: शुभ रात्री

शुभ रात्री
खेळाडू

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असतं!

शुभ रात्री
सल्लागार

जीवनात आपला सल्लागार कोण आहे, हे फार महत्वाचे आहे. पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचाच झाला! कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा!

शुभ रात्री
व्यक्ती आणि व्यक्तिमत्व

बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कसं विसरावं. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते, पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते.