मराठी संदेश: कविता
वाचकांनी पाठवलेल्या काही खास आणि निवडक कवितांचा संग्रह!

जपणूक
कविता
पाय जपावा वळण्याआधी
तोल जपावा ढळण्याआधी

अन्न जपावे विटण्याआधी
नाते जपावे तुटण्याआधी

शब्द जपावा बोलण्याआधी
अर्थ जपावा मांडण्याआधी

रंग जपावे उडण्याआधी
मन जपावे मोडण्याआधी

वार जपावा ... ...अजून पुढं आहे →
फक्त हिमतीने लढ..
कविता
घरटे उडते वादळात
बिळा-वारूळात पाणी शिरते
कोणती मुंगी? कोणतं पाखरू?
म्हणून आत्महत्या करते?

प्रतिकूल परिस्थितीतही
वाघ लाचारीने जगत नाही
शिकार मिळाली नाही म्हणून
कधीच ... ...अजून पुढं आहे →
कसं आहे ना?
कविता
एक कागदाचं पान असतं
श्री लिहलं की पूजलं जातं
प्रेमाचे चार शब्द लिहले की जपलं जातं
काही चुकीचं आढळलं की फाडलं जातं

एक कागदाचं पान असतं
कधी त्याला विमान ... ...अजून पुढं आहे →
आठवणी
कविता
कधी वाटे जावे आठवणींच्या गावा।
थकलेल्या जीवाला मिळेल सुखद विसावा।
ना भविष्याची चिंता ना वर्तमानाचा हेवा।
भूतकाळाच्या गर्भात दडलाय सोनेरी क्षणांचा ठेवा।
बायको
कविता
बायको जर नसेल तर
राजवाडा पण सुना आहे
बायकोला नावं ठेवणे हा
खरंच गंभीर गुन्हा आहे!

खरं पाहिलं तर तिच्याशिवाय
पानही हालत नाही...
घरातलं कोणतंच सुख
बायको शिवाय फुलत ... ...अजून पुढं आहे →
×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०