मराठी संदेश: विचारधन
विचारधन, अवतरणे, अनुभव आणि अनुभूती यांचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

दृष्टिकोन
विचारधन
मराठीला जी "मज्जासंस्था" वाटते ती इंग्रजीला "नर्व्हस सिस्टीम" वाटते... दृष्टीकोनातला फरक, दुसरं काय?
- पु.ल देशपांडे
उपयोग
विचारधन
रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते!
मौन
विचारधन
तेव्हाच बोला जेव्हा ते मौनाहून उत्कृष्ट असेल!
तोल
विचारधन
जो गेल्यानंतर कळतो, त्याला तोल म्हणतात!
व. पु.
जाणीव
विचारधन
खाली पडलेल्या सुक्या पानावरुन जरा हळुवारपणे जा, कारण कडक उन्हात आपण त्याच्याच सावलीत उभे राहिलो होतो!
फसवणूक
विचारधन
माणूस केव्हा फसतो ते सांगू? "आपल्याला काय मिळवायचं होतं हे जेव्हा माणसाला समजत नाही, तेव्हा तो फसलेला असतो!"
#वपु.

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२१