मराठी संदेश: शुभ दिन
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

वेळ आणि माणसं
शुभ दिन
चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्वाची असतात. कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते!
माणसं
शुभ दिन
चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारी माणसं नेहमी आठवणीत, मनात, शब्दात आणि
आयुष्यातही राहतात!
आयुष्य हे...
शुभ दिन
जीवनात चुका, अपयश आणि नकार हा प्रगतीचा भाग असतो. कारण कोणीही यांना सामोरे न जाता यशस्वी होऊ शकत नाही!
गैरसमज...
शुभ दिन
कुणाबद्दल मन गैरसमजाचं जाळं विणायला लागलं की तडक त्या व्यक्तीशी बोला. निसर्गाने बोलायचं हे वरदान फ़क्त मनुष्याला दिलंय. गोष्ट तेवढी गंभीर नसते, पण गैरसमजामुळे नात्याला किड लागते!
आशा निराशा
शुभ दिन
नासलेल्या दुधातुन अनेक चविष्ठ पदार्थ बनवता येतात. गरज असते ती "दुध नासले" या निराशेतुन बाहेर पडण्याची आणि थोड्याशा कल्पकतेची. जीवनही असचं असतं, आलेल्या प्रत्येक संकटात दडलेली संधी शोधता आली की ... ...अजून पुढं आहे →

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०