मराठी संदेश: सुप्रभात
सुप्रभात! शुभ सकाळ शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

आनंद
सुप्रभात
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे, जे तुम्हाला जमणार नाही, असं वाटतं वाटतं ते साध्य करुन दाखवणं!
मौल्यवान
सुप्रभात
जे विनामूल्य आहे तेच सर्वात मौल्यवान आहे. झोप, शांतता, आनंद, हवा, पाणी, प्रकाश आणि आपला श्वास! हसत रहा, समाधानी रहा!
वाद आणि संवाद
सुप्रभात
संवाद आणि वाद यात फार थोडा फरक असतो. वाद कोण योग्य आहे हे शोधण्यासाठी असतो तर संवाद काय योग्य आहे ते शोधण्यासाठी!
जिद्द
सुप्रभात
नशिबाच्या सगळ्याच सोंगट्या आपल्या मनाप्रमाणं पडतीलच असं नाही, पण जशा पडतील तशाही परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द ही असावीच.
सुख दुःख
सुप्रभात
सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेते. दोन्ही परीक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात नेहमी यशस्वी होतो!
समाधान
सुप्रभात
एखाद्याचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा एखाद्याचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही यात समाधान मानलं तर आयुष्यात आपण कधी दुःखी न होता सुखी जीवन जगू!

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२१