मराठी संदेश: टोचण!
खास लोकांसाठी खास मराठी शैलीत टोचण!

गुंतवणूक
टोचण!
त्यादिवशी बायकोकडं काळजीपूर्वक बघितलं अन् लक्षात आलं... आपल्या आयुष्यातील फक्त हीच "गुंतवणूक" पाहता-पाहता डबल झाली..!
दारू
टोचण!
दूध फक्त हाडे मजबूत करतं, चहा हे नाती-प्रेम मजबूत करतो! मात्र दारू हे जन्म-जन्माचं नातं बनवते!
शिवी
टोचण!
शिवी तोंडात आली की पटकन देऊन टाकायची, तोंडात ठेवायची नाही. घाण असते ती..!
अमूल्य संधी
टोचण!
अहो, चौऱ्यांशी लक्ष जन्मानंतर व्हॉटसअप मिळालं आहे. मग ही संधी अशीच वाया नका घालवू! पोस्ट आणि शेअर करत रहा!
विचार
टोचण!
अंतरपाटाच्या एका बाजूला विचार चालू असतो तिला "मिठीत" घेण्याचा तर दुसऱ्या बाजूला विचार चालू असतो त्याला "मुठीत" ठेवण्याचा!
मोबाईल
टोचण!
या जगात फक्त मोबाईललाच माहित आहे की त्याचा मालक किती गुणी आणि संस्कारी आहे!

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२१